Ticker

6/recent/ticker-posts

उत्तमचंद बगडिया कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम; विद्यार्थ्यांनी गाठले यशाचे शिखर



वाशिम ओंकार पुरी 

स्थानिक काशिबाई मगनलालजी बगडिया बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था संचलित, उत्तमचंद बगडिया कनिष्ठ महाविद्यालय, रिसोडच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक (बारावी) बोर्ड परीक्षेत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाने जाहीर केलेल्या शाखानिहाय गुणवंत विद्यार्थ्यांची माहितीनुसार, विविध शाखांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे:

१.     कला शाखा (Arts):प्रथम क्रमांक: अनिकेत रोहिदास चऱ्हाटे,द्वितीय क्रमांक: शेख शाहीन शेख सलीम, तृतीय क्रमांक: महेक एजाज कुरेशी

२.     वाणिज्य शाखा (Commerce):प्रथम क्रमांक: कु. प्राची शिवाजी सानप,द्वितीय क्रमांक: कार्तिक धनेश सावंत,तृतीय क्रमांक: संघमित्रा रवी पंडित

३.     विज्ञान शाखा (Science):प्रथम क्रमांक: कु. आचल संतोष बानोरे,द्वितीय क्रमांक: कु. प्रेरणा दीपक वायाळ,तृतीय क्रमांक: विराट हरिदास दाढे

विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उत्तमचंदजी बगडिया, सचिव श्री. विठ्ठलराव वसू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, संस्थेमार्फत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. या यशाबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.