Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा तालुक्यातील ताड शिवनी गावामधून रात्रंदिवस रेती व्यवसाय जोमात महसूल विभाग कोमात.

  


महेंद्र खरात प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण न्युज

सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी गावांमधून रेतीय व्यवसाय रात्रंदिवस जोमात मात्र स्थानिक महसूल अधिकारी गेलेत कोमात याचं गोड बंगाल काय कुठेतरी पाणी मुरतंय याची शंका आता गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना फोन केला असता महोदयांचा फोन स्विच ऑफ किंवा आऊट ऑफ कव्हरेज सांगतो बऱ्याच वेळेस स्थानिक नागरिकांनी तलाठ्यांना फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण महाशयांचा तीन दिवसापासून फोनच बंद आहे  त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे 

स्थानिक महसूल अधिकाऱ्याकडे माननीय तहसीलदार साहेबांनी व विभागीय अधिकारी खडसे साहेबांनी वेळीच लक्ष देऊन गावकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी होत आहे रस्त्याच्या बाजूच्या नाल्याचा अक्षरशः रेती वाहतुकीने धिंगाणा झालेला आहे स्थानिक ग्रामपंचायत  ग्रामसेवक साहेबांना किंवा सरपंचांना गावकर्याकडून विनंती करण्यात येत आहे गाव सोडून पर्यायी रस्त्याचा रेती वाहतूकदारांनी अवलंबन करावा अशी मागणी होत आहे आता ह्याकडे महसूल विभाग किंवा तहसीलदार साहेब गांभीर्याने घेतात रेती माफियांना वटीत घेतात की कारवाई करतात याकडे आता सगळ्या ताड शिवणी गावचे लक्ष लागले आहे