मराठवाडाप्रतिनिधी मारोती गाडगे गेवराई (बीड): -
गेवराई तालुक्यातील सुशी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन अभिवादन करण्यात आले. तर दि.२७ एप्रिल २०२६ रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत गावातील सर्व जाती-धर्मातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुशी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जयंतीनिमित्त गावात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मिरवणूक मार्गावरुन मिरवणूक काढत अभिवादन करुन तरुणांनी त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प केला. तर यावेळी कार्यक्रमास सुशी च्या सरपंच शशिकलाबाई कांबळे , रिपाइंचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, मनोज हजारे, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा संघटक प्रदीप तुरुकमारे, उपसरपंच गजानन मोंढे, विजय पौळ, विजय राठोड, पंडित तुरुकमारे, लक्ष्मण तुरुकमारे ,संदीप तुरुकमारे, बबन तुरुकमारे, सोमनाथ तुरुकमारे, सुर्यकांत तुरुकमारे, विक्रम तुरुकमारे, दौलत तुरुकमारे ,केरबा कांबळे, सयाजी कांबळे, सर्जेराव कांबळे, नंदु मोंढे, संभाजी पौळ, विठ्ठलमामा राऊत यांच्यासह गावातील जेष्ठ मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात महिलांसह अबालवृद्धांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता सर्वांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या समतेच्या आणि बंधुतेच्या विचारांना उजाळा देत जयंती उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिम वादळ ग्रुप, सुशी (व) यांच्यासह गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.





Social Plugin