Ticker

6/recent/ticker-posts

एन.एम. एम. एस.परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमुळे पुसेगावच्या वैभवात भर - डॉ. श्री सुरेशराव जाधव

 




( श्री हनुमानगिरी  हायस्कूल मध्ये विद्यालयाच्या वतीने एन. एम. एम.एस. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न) 

बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

बुद्धिमान विद्यार्थी नेहमीच सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत असतात. कठोर परिश्रम त्याचप्रमाणे गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन व संस्थेचे पाठबळ,विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प पदाधिकारी यांचे उपक्रम आणि पालकांचा विश्वास हा विद्यार्थ्यांच्या यशाचा मंत्र ठरला आहे. एन. एम. एम. एस. परीक्षेत खटाव तालुक्यात अग्रेसर  ठरलेले श्री हनुमानगिरी हायस्कूल खऱ्या अर्थाने आदर्श विद्यालय आहे. आत्तापर्यंत या शाळेने अनेक हुषार व गुणी विद्यार्थी घडवले आहेत.एकूण 8  शिष्यवृत्तीधारक  विद्यार्थी यांनी पुसेगावच्या शैक्षणिक वैभवात भर घालण्याचे काम केले असून त्यांच्या यशाचा सर्वांना सार्थ अभिमान वाटत आहे. असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष  डॉ. श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले. विद्यालयाच्या वतीने  नुकताच यशस्वी विद्यार्थ्यांचा  कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

  संस्था उपाध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब जाधव व संस्था सचिव मा. श्री मोहनराव जाधव खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव   यांनी सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

     यावेळी शाळेच्या वतीने  सन्मानचिन्ह तसेच मेडल देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा  व मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रभात गायकवाड व चैतन्य चव्हाण यांनी विद्यार्थी मनोगते व्यक्त केली. श्री वाय. ए. घुगरे यांनी प्रास्ताविक केले.

    कार्यक्रमास विश्वस्त श्री विश्वनाथराव जाधव, श्री सुरेशराव चव्हाण, सौ भूपाली जाधव, सौ ढोले मॅडम, सौ. मुल्ला मॅडम,सौ माने मॅडम ,श्री राजकुमार नौगण,श्री मदने,श्री गायकवाड, प्राचार्य श्री. डी.एन.गोफणे, पर्यवेक्षक मोहनराव गुरव , मार्गदर्शक शिक्षक श्री अनिल पाकले, सौ अमृता जाधव, सौ ज्योती गुरव,पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. बी. एस. जाधव यांनी सूत्रसंचालन केले श्री अनिल पाकले यांनी आभार मानले