उमरगा तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 07/05/2026
वसुलीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असणाऱ्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत 'एक नंबर' असल्याचा दावा करणाऱ्या गावात अवकाळी पावसाने प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे गावातील मुख्य गटारी तुंबून त्याचे घाण पाणी थेट गोरगरिबांच्या घरात व जिल्हा परिषद शाळेच्या समोर पाणी साचल्याने व तसेच शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.वसुलीत अव्वल, नियोजनात शून्य?उमरगा तालुक्यातील येणेगुर हे गाव शासकीय कर वसुली आणि स्वच्छतेच्या पुरस्कारांसाठी नेहमीच चर्चेत असते. मात्र, प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन कागदावरच असल्याचे दिसून आले. पावसाच्या पहिल्याच फटक्यात गटारींचे पाणी रस्त्यावर आणि त्यानंतर थेट लोकांच्या घरात शिरले..प्रशासनाला किती 'नंबर' द्यायचा?एकीकडे गाव आदर्श आणि स्वच्छ असल्याचे भासवले जात असताना, थोड्याशा पावसाने उडालेली ही दाणादाण पाहता ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या दाव्याला किती 'नंबर' द्यावा, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. "आम्ही कर वेळेवर भरतो, पण पावसाळ्यात घाण पाण्यात राहावे लागत असेल, तर या स्वच्छतेच्या पुरस्काराचा काय फायदा?" अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.तात्काळ गावातील सर्व गटारी व्यवस्थित करून घ्यावे व सांडपाणी रस्ता करून द्यावे सांडपाणीचे पाणी गावच्या बाहेर जावे याची तात्काळ नियोजन करण्यात यावे व तुंबलेल्या गटारींची कायमस्वरूपी स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता यावर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin