Ticker

6/recent/ticker-posts

आ. श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते मालेगांव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न



ग्रामीण प्रतिनिधी -विश्वराज वाकोडे 

अर्धापूर तालुक्यातील मालेगांवच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध कामांचे भूमिपूजन आज आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चव्हाण यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

*"मालेगावच्या विकासासाठी कटिबद्ध" - आ. श्रीजया चव्हाण भूमिपूजनानंतर बोलताना आमदार श्रीजया चव्हाण म्हणाल्या, “मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांना आवश्यक असलेल्या प्रत्येक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. ही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर परिसराचा चेहरामोहरा निश्चितच बदलेल व नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.”

*नागरिकांकडून स्वागत, आणखी मागण्या*

स्थानिक नागरिकांनी या विकासकामांबद्दल आनंद व्यक्त करत आमदार चव्हाण व प्रशासनाचे आभार मानले. यावेळी गावातील इतर प्रलंबित समस्यांचे निवेदनही आमदारांना देण्यात आले. आगामी काळातही अशाच प्रकारे विकासकामांचा धडाका सुरू राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.