पुसेगाव दि . [प्रतिनिधी ]
राजापूर ता . खटाव गावातील सामाजिक आणि विकासाभिमुख कार्यकर्ते श्री अजित दिडके गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी बायफ संस्थेच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने वाडी प्रकल्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर आंबा, चिकू यांसारखी फळझाडे लावून शाश्वत उत्पन्नाचे साधन तयार करणे.शेतकऱ्याना कमी पाण्यासाठी पर्यायी ड्रिप संच तसेच शाश्वत उर्जेसाठी स्वयापकासाठी बायो गैस, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गांडुळखत प्रशिक्षण,महिला सक्षमीकरनासाठी नर्सरी व्यवसाय,वृक्षारोपणाच्या कार्यक्रमत्तून सामाजिक वनीकरनाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावणे,नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन ,पाणलोट विकासाच्या माध्यमातून जलसंधारण कामे जसे सीमेंट बंधारे, दगडी बंधारे,हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून अभ्यास सहली तसेच विद्यमान आमदार श्री महेश शिंदे यांचा पाठपुरावा घेऊन राजापुर सातपुता वस्ती येथे १०० किलोवॅट क्षमतेचा ट्रांसफॉर्म याबरोबर सातपुता ओढ्यावर ब्रिजसाठी ३० लक्ष निधी प्रशासकीय मान्यता मंजूर झाली आहे . लवकरच प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल
मात्र, काल रात्री सातपुता वस्ती येथे राजकीय विरोधातून अज्ञात लोकांनी त्यांच्या फार्ममध्ये घुसून जवळपास २००० हजार स्क्वेअर फुट अझोला शेडनेट हाऊस व अझोला बेड असे जवळपास २५ ते ३०००० रुपयांचे सामान धारदार हत्याराच्या सहाय्याने फाडून नुकसान करण्यात आले .ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेनंतर गावातील नागरिकांनी या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.
“जे लोक समाजासाठी चांगले काम करतात, त्यांच्यावर असे हल्ले होणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला इशारा असल्याचे बोलले जात आहे. अशा घटनांवर वेळीच कठोर कारवाई झाली नाही तर समाजातील सकारात्मक कामांना धक्का बसू शकतो.





Social Plugin