जामनेर (प्रतिनिधी -गणेश जाधव):
स्थानिक सह दुय्यम निबंधक जामनेर कार्यालयातील शिपाई नाईक विलास चौधरी हे प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यालयाच्या वतीने एका विशेष निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
33 वर्षांपासून विलास चौधरी यांनी सेवा बजावली असून ते जामनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने बजावली. आपल्या कार्यकाळात त्यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी नेहमीच सौजन्याचे वर्तन ठेवले. त्यांच्या याच मृदू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे व स्नेहाचे बनले होते.
स्नेहपूर्ण निरोप समारंभ::
या कार्यक्रमाला कार्यालयातील संदीप पाटील सह दुय्यम निबंध अधिकारी. राजू पाटील सह दुय्यम निबंधक पहूर. कुलकर्णी सह दुय्यम निबंधक आणि स्वाती पाटील वरिष्ठ लिपिक. व संगणक ऑपरेटर गणेश पाटील. गौतम इंगळे. आकाश चौधरी व कर्मचारी व स्टॅम्प वेंडर गोपाल महाजन. युवराज पाटील.राजू चौधरी. नारायण (सोनू)पाटील. नारायण वाघोदे. विजू लामखेडे. संजू महाजन. दीपक महाजन. गणेश जाधव. बंटी पाटील. रावसाहेब पाटील बिल्डर. ॲड साठे. ॲड. योगेश वखरे . योगेश लोहार. व इतर मान्यवर नातेवाईक व सहकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विलास चौधरी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे मनोगत:
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सहकाऱ्यांनी विलास चौधरी यांच्या कामाप्रती असलेल्या शिस्तीचे आणि समर्पणाचे कौतुक केले. "एका निस्सीम कर्मचाऱ्याची उणीव कार्यालयाला नक्कीच भासेल," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. सत्काराला उत्तर देताना विलास चौधरी भावूक झाले होते; त्यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी विलास चौधरी यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महसूल विभागातील कर्मचारी आणि त्यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Social Plugin