Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या.....

 

. पारनेर प्रतिनिधी 

      टाकळी ढोकेश्वर येथे शेतकऱ्यांच्या वतीने कांद्याला बाजार वाढला पाहिजे ,यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते ,यावेळी आंदोलनाचे नेतृत्व रवींद्र राजदेव यांनी केले होते त्यामुळे कोणाच्यातरी सांगण्यावर गुन्हा दाखल करण्याचा आरोप रवींद्र राजदेव यांनी केला.

         यावेळी पोलिस प्रशासनाकडून आंदोलन उधळून टाकण्याचा डाव पोलिसांकडून चालू होता ,परंतु शेतकरी आंदोलनावर ठाम असल्यामुळे आंदोलन करण्यात आले ,वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि म्हणून पोलिसांनी रवींद्र राजदेव आणि इतर १५ जणांवर सूडबुद्दीन कार्यवाही केली ,ते गुन्हे मागे घेतले नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा टाकळी गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी दिला आहे .

     शेतकऱ्याच्या कांद्याला पिकवायला १५ ते २० रुपये खर्च येतो आणि आताच्या बाजारभावानुसार कांदा ५ ते ६ रुपये किलोप्रमाणे जातो त्यामुळे त्याचा उदरनिर्वाह कांद्यावर अवलंबून असल्यामुळे हमी भाव देऊन अनुदान सुद्धा द्यावे ,तसेच निर्यात बंदी ताबडतोब हटवावी आणि कांदा खरेदीकेंद्र चालू करावी .अशी मागणी रविंद्र राजदेव यांनी केली आहे.