प्रतिनिधी :- लाडलेसाब नदाफ
वार्ताहर
तुगाव (ता. उमरगा) येथील बौद्ध युवक भालचंद्र कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना 18 मे रोजी घडली असून, या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना तातडीने अटक करावी यासाठी दि 29 रोजी उमरगा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आंबेडकरी जनतेच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच तहसीलदार विभागाला देण्यात आले आहे
निवेदनानुसार, भालचंद्र कांबळे हे गावातील मित्रांसमवेत जळकोट येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून परतत असताना रोहित दीपक जोमदे, पंकज शंकर जोमदे, चाँद फकीर व गहिनीनाथ जोमदे यांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या हल्ल्यात भालचंद्र कांबळे गंभीर जखमी झाल्याने त्याच दिवशी मुरूमच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.दरम्यान मुरूम पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे उर्वरित तीनजण अद्याप फरार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे फरार आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी 29 रोजी रास्ता रोको करण्यात येणार आहे
निवेदनावर रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी, एस. के. चेले, हरीश डावरे, धीरज बेळम्बकर, अर्जुन मुके, संजय कांबळे,दगडू भोसले, प्रदीप भालेराव,खंडु भंडारे, रत्नदीप सोनकांबळे,बाबासाहेब गायकवाड,काकासाहेब भंडारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





Social Plugin