देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के महाराष्ट्र ग्रामिण न्युज
निसर्गरम्य कोकणामध्ये सध्या वादळी पावसाचे संकेत निर्माण झालेले आहेत. तेव्हा अनेक मुंबईहून चाकरमाने आलेले आहेत गावाला यांनी परतीचा वेध घेतलेला आहे. सध्या कोकणामध्ये वादळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे अनेक वातावरणात हवामानाचे बदल झालेले आहेत. हवामानात कधी अति उष्णता तर अति वादळी वाऱ्याचे संकेत किंवा थंड हवा अशा परिस्थितीचे वातावरण सध्या कोकणात निर्माण झालेले आहे. ज्या बागायतदारांचे आंबे आहेत त्या बागायतदानांनी आपले आंबे झाडावरन लवकरात लवकर काढण्याच्या तयारीत दिसलेले गेलेले आहेत की जेणेकरून आंबा पीक हे खराब होणार नाही कारण पावसाच्या आक्रमणामुळे याची हे बागायतदार शेतकरी खबरदारी घेत आहे. त्याशिवाय कोकणामध्ये आलेले पर्यटक कोकणामध्ये पडणाऱ्या पावसाचा मनमुराद आनंद घेत आहेत. कोकणाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये पावसाची चाहूल लागली असली तरी निसर्गाच्या हवामानाचा समतोलपणा कमी जास्त प्रमाणात असा दिसण्यात आलेला आहे. काही कोकणातल्या ग्रामस्थांनी अति उष्णतेमुळे लोकांना ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अति उष्णतेचे त्रास, शारीरिक थकवा असे विकार जाणवले गेलेले आहेत. सध्या कोकणात आंबा सीजन हा संपत आल्यामुळे आंबा विक्रीला प्रचंड मागणी आहे. अनेक कोकणातील गावागावातील पूजा, लग्नसराई, व विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे कार्यकर्त्यांनी आयोजन केलेले होते ते बहुतेक ठिकाणी पार पाडले गेलेले आहेत. कोकणातील मत्स्य व्यवसाय हा सुद्धा आता मे च्या अखेरपर्यंत चालेल आणि त्याला सुद्धा पावसाच्या दरम्यान स्थगिती मिळेल.
अनेक मासे खवय्या यांनी कोकणातील मिळणाऱ्या माशांचा मनमुराद आस्वाद घेतलेला आहे. सध्या कोकणातील हवामान परिस्थिती ढगाळ असून पावसाच्या आगमनाची स्थिती आहे. कोकणातील एसटी महामंडळातील गाड्यांना अफाट गर्दी दिसलेली आहे. प्रायव्हेट गाड्या, लक्झरी, कार यांना सुद्धा गर्दी दिसण्यात आलेली आहे. कोकणातील आंबे, फणस, काजू, कोकम, ह्या वस्तू घेताना कोकणी पर्यटक व मुंबईचे चाकरमानी फार उत्सुक दिसले. अनेक ठिकाणी कोकणामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे तेव्हा अनेक गाड्यांची यायची गैरसोय होत आहे. तेव्हा या गावच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने जे रस्ता दुरुस्त करण्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतलेले आहे ते योग्य स्वरूपाचे आहे व त्याला ते योग्य वळण देत आहे व ते काम पूर्ण लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. अनेक कोकणामध्ये जे किल्ले आहेत त्यांना पाहण्यासाठी जे पर्यटक येतात त्यांना विशेष करून किल्ल्यावर गायडन्स ठेवलेले असतात ते त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत व त्यांच्या सुख सोयीची सुद्धा व्यवस्था ते करत आहेत. त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ सुद्धा पर्यटकांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करताना दिसलेले आहेत. अशा निसर्गरम्य कोकणामध्ये सध्या वादळी पावसाचे संकेत असताना सुद्धा कोकण पर्यटक प्रेमी यांची आवड कोकणा त येण्याची पसंती काही औरच आहे.





Social Plugin