Ticker

6/recent/ticker-posts

खडकीजवळ दोन दुचाकींच्या भिषण अपघातात सैन्य दलातील जवानाचा मृत्यु



दिपक गुरव@  चाळीसगाव

चाळीसगाव सैन्यदलात नियुक्त असलेल्या हिरापूर येथील जवानाच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत जवानाचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळ शुक्रवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास घडली. मृत जवान नुकताच एका महिन्याच्या सुटीवर आला होता. शुक्रवारी दुचाकीने जात असतांनाच हा दुर्दैवी अपघात घडल्याने हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे.

घटनेची माहीती अशी की, भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले सागर भगवान नुकतेब एका महिन्याच्या सुटीवर निकुंभ (२८) रा. हिरापूर हे आले होते. शुक्रवारी रात्री ८.१५ वाजेच्या एमएच.१९ सीटी. ७७८१ या दुचाकीने जात असतांना चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाच्या पुढे त्यांच्या दुचाकीला एमएच.१९ बीवाय.८६३५ या दुचाकीने समोरून जोरदार धडक दिली. त्यात सागर निकुंभ हे दुचाकीवरून खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. धडक देणारा दुचाकीचालक पळून गेला.

अपघात झाल्याचे कळताच नागरीकांना घटनास्थळी धाव घेऊन जखमी सागर निकुंभ यांना तात्काळ चाळीसगाव शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर मयत निकुंभ यांचा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी समाधान भगवान पवार रा. खडकी यांच्या फिर्यादीवरून मयत सागर निकुंभ यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या एमएच.१९ बीवाय.८६३५ या दुचाकीचालकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंब शोकाकूल दरम्यान दुचाकी अपघातात ठार झालेले सैन्य दलाचेजवान सागर निकुंभ यांच्या मृत्युमुळे हिरापूर गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी व ८महिन्यांचा मुलगा आणि अडीच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतांना अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने दोन चिमुकल्यांचे पितृ छत्र हरपले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

सैन्यात कार्यरत असलेले जवान सागर भगवान निकुंभ यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना गावाचा अभिमान ठरलेला जवान अचानक निधून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वीर जवान सागर निकुंभ यांच्या पार्थिवावर हिरापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या तुकडीचे कमांडर, सहकारी जवान तसेच पोलीस प्रशासन उपस्थित होते. भारतीय सैन्याच्या वतीने शासकीय मानवंदना देत वीर जवानाला अखेरचा सलाम करण्यात आला. पोलीस प्रशासनाकडूनही शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

तसेच महसूल विभाग, जिल्हा सैनिक कार्यालय, आजी माजी सैनिक संघटना, सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीनेही वीर जवानास मानवंदना अर्पण करण्यात आली.