सिंदखेड राजा प्रतिनिधी महेंद्र खरात दि 28. 05. 2026.
सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी गावात निर्माण झालेल्या किंवा पाणी टंचाईच्या प्रश्नांना अखेर न्याय मिळाला असून ग्रामपंचायत सदस्य अमोल अशोकराव खरात यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्यामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली जिल्हाधिकारी बुलढाणा गट विकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आलेल्या अधिकृत तक्रारीनंतर आणि विविध वृत्तपत्र प्रसारण माध्यम आणि या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले गावातील अनेक दिवसापासून बंद पडलेली मुख्य हापसी अखेर दुरुस्त करण्यात आली असून नागरिकांना पुन्हा पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे पाणीटंचाईमुळे महिला वृद्ध आणि लहान मुलांना मोठा ताण सहन करावा लागत होता ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र हा प्रश्न केवळ गावापुरता मर्यादित न ठेवता प्रशासनाच्या दरबारात ठामपणे मांडण्याचे काम अमोल खरात यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरवठा करत नागरिकांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या त्यांच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी आवाज उठवण्याची लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली या संपूर्ण प्रकरणात विविध प्रेस मीडिया वृत्तपत्र प्रतिनिधी आणि सोशल मीडियाचाही महत्त्वाची भूमिका बजावली आहे पाणी प्रश्नाची बातमी अत्यंत ठळकपणे प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन हापसी दुरुस्तीचे आदेश दिल्याचे माहिती समोर येत आहे गावातील नागरिकांनी प्रशासनाचे तसेच न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे ग्रामपंचायत सदस्य अमोल खरात यांचे आभार व्यक्त केले आहे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून एकजुटीने आणि लोकशाही मार्गाने लढा दिल्यास प्रश्न नक्की सुटतात अशी भावना आता गावकऱ्याकडून व्यक्त होत आहे





Social Plugin