Ticker

6/recent/ticker-posts

निढळच्या हनुमान विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम ;



आर्यन विलास बोटे 96.60% गुणांसह प्रथम

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत निढळच्या हनुमान विद्यालयाने दैदीप्यमान यश संपादन केले आहे .विद्यालयाचा एकूण निकाल 97.56% लागला असून आर्यन विलास बोटे याने 96.60% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला .विद्यालयात प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी खालील प्रमाणे आहे .

1)आर्यन विलास बोटे -96.60% (प्रथम )

2)कु .हर्षदा आनंदा खुस्पे -94.40% (द्वितीय )

3)ओम अधिक गाढवे -93.40% (तृतीय)

तसेच 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे -

कु .श्रावणी किसन बोटे 92.60% 

कु .वैष्णवी संतोष खुस्पे 92.7% 

कु .आर्या अजित गायकवाड 92.60% 

कु . गीता मारुती सूर्यवंशी 91.00%

 कु .अक्षदा प्रकाश गाढवे 90.40%

         या अभूतपूर्व यशाबद्दल उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे ,विभाग प्रमुखांचे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . जगदीश निर्मळ सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

        या यशाबद्दल मा . श्री .चंद्रकांत दळवी साहेब (चेअरमन , रयत शिक्षण संस्था ,सातारा ) मा . श्री .जगदीश निर्मळ सर ( मुख्याध्यापक , हनुमान विद्यालय , निढळ ) सर्व विषय शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी ,स्थानिक स्कूल कमिटी ,शाळा व्यवस्थापन समिती , शाळा व्यवस्थापन व विकास समिती , पालक शिक्षक संघ , सर्व ग्रामस्थ ,निढळ व निढळ पंचक्रोशीतून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे .विद्यार्थ्यांच्या या यशामुळे निढळच्या हनुमान विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे .