जालना | प्रतिनिधी – कैलास कोल्हे
जालना शहरासह परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत असून वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याच्या चर्चेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी पंपांवर धाव घेत आहेत. यामुळे शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनांच्या वाढत्या रांगांमुळे रस्त्यावर वाहतूक मंदावली असून काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकारही घडल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, नियमित आणि सुरळीत इंधन पुरवठा सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





Social Plugin