रयत शिक्षण संस्था महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९६.४२% लागला असून परीक्षेस बसलेल्या एकूण २८ विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे .या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरातून विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
*विद्यालयातून प्रथम पार्थ भरत गायकवाड ८८.६०% , द्वितीय दिक्षा राजाराम वलेकर ८५.४०% ,
तृतीय क्रमांक कु वैष्णवी गोरखनाथ वाघ ८३.६०% यांनी घवघवीत यश संपादन केले आहे .
* विद्यालयातून डिस्टिंक्शन मध्ये ८ विद्यार्थी , प्रथम श्रेणी मध्ये ११ विद्यार्थी ,
द्वितीय श्रेणी मध्ये ६ व पास श्रेणी मध्ये २ विद्यार्थी आहेत .
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड एस .आर , स्कुल कमीटी सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , माता पालक संघ सदस्य , सर्व शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी , कटगुण , उंबरमळे , धावडदरे ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला .व विद्यालयाची यशाची परंपरा टिकवल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . विद्यालयाच्या प्रगतीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .





Social Plugin