Ticker

6/recent/ticker-posts

श्री हनुमानगिरी हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात (जुन्या आठवणींना उजाळा )



 बुध   दि . [प्रकाश २ाजे घाटगे ] 

 श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज किमान कौशल्य तांत्रिक विभाग मधील सन 2002-2003 मधील इयत्ता बारावीच्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. सकाळपासून माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आणि आनंद दिसत होता. प्रत्येक जण एकमेकांची आपुलकीने चौकशी करत होता. शाळेचे बदललेले भौतिक स्वरूप तसेच या शाळेने घडवलेली भविष्य व आदर्श विद्यार्थी याचे प्रत्येक जण कौतुक करत होता.

 दरम्यान शिक्षण पूर्ण केले त्याच वर्गखोल्यांमध्ये या विद्यार्थ्यांनी जुन्या गोष्टीचा आनंद घेतला.

 फिरोज मनेर याने प्रास्ताविक केले.

 पर्यवेक्षक मा.श्री. मोहनराव गुरव यांनी यावेळी विद्यार्थ्यांनाआयुष्यात संस्कार तसेच सामाजिक ज्ञान व शिक्षण याचा कसा उपयोग होतो याविषयी अधिक माहिती दिली.

 या बॅचच्या वतीने यावेळी शाळेस भेटवस्तू सुपूर्त करण्यात आली.

 यानंतर विद्यार्थ्यांनी मैदानावर विविध खेळ खेळले.

श्री फिरोज मणेर याने स्वागत केले.मेळावा यशस्वी होण्यासाठी जगदीश देवकर, राजेश काळंगे, विजय फडतरे, राकेश वाघ, सचिन शेडगे, युवराज वाघ, निलेश भुजबळ, सागर उल्हाळकर, उत्तम भोसले, अरविंद पटेल,कमलेश देवकर,गणेश जगताप, प्रशांत कर्णे, अनुप्रिया खारगे, सारिका शिंदे, रेश्मा गायकवाड, प्रिया काटकर, प्राची गोडसे, सुषमा लाटणे, अर्चना मॅडम इ.नी परिश्रम घेतले.

: छायाचित्र - पुसेगाव पर्यवेक्षक मा. श्री मोहनराव गुरव यांच्याकडे भेटवस्तू सुपूर्त  करताना ज्युनि.कॉलेजचे माजी विद्यार्थी छाया - प्रकाश राजेघाटगे बुध