बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील राजापूर येथील श्री नृसिंह नारायण मंदिरातील देवाच्या सिंहासनाचे सुशोभिकरण ज्ञानदेव शंकर सरोदे व सौ. दिपा ज्ञानदेव सरोदे या दोघां उभयतांनी अतिशय परिश्रमपूर्वक व स्वखर्चाने नुकतेच केले. हे मंदिर १२५ वर्ष जुने त्यांच्या पुर्वजांनी बांधले होते व यांनी २०२३ साली जिर्णोद्धार केला आणि *२५ मे २०२६ रोजी सिंहासन अर्पण केले.* या सिंहासनासाठी सहा कारागिर तीन महिने कलाकुसरीचे नक्षीकाम करत होते. सिंहासन पितळेच्या पत्र्यावर नक्षीकाम केले आहे व त्यावर प्लास्टिक कोटिंग करण्यात आले आहे.
बहुतेक संपूर्ण खटाव तालुक्यात हेच पहिले सुंदर व मनमोहक असे राजापूरचे श्री नृसिंह नारायण मंदिर आहे. अशा पवित्र स्थळास सर्वं भक्तगणांनी भेट द्यावी.






Social Plugin