Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपाहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे.




जळगाव:महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे की, जळगाव बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपाहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे. मनसे सेनेच्या मागणीनंतर विभाग नियंत्रकांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे की, जळगाव बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपाहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे. या निमित्ताने मनसे सेनेच्या जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, संदीप मांडोळे, राहुल चव्हाण, राजेश मराठे, विकास पात्रे, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल्ल यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.