गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
काही जुन्या सरकारी अधिसूचना रद्द करण्याची मागणीही संघटनांनी केली. औषधे ही सामान्य वस्तू नसून, त्यांची विक्री नियमांनुसार आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच व्हावी, असे संघटनांनी स्पष्ट केले. सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला, अशी माहिती कारंजा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष बंड यांनी कळविले. (एआयओसीडी) बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन औषधविक्रीचे (ई-फार्मसी) वाढते प्रमाण, मोठ्या कंपन्यांचे शोषणात्मक किंमत, धोरण, करोना काळातील जीएसआर २२० (ई) आणि जीएसआर ८१७ (ई) या अधिसूचना मागे घ्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन' आणि 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स' या संघटनांनी निवेदन प्रसिद्ध केले.





Social Plugin