७ लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ३ आरोपीं. जेरबंद!!
मन्सूर शहा. धोत्रा.भ.चिखली.:--
प्राप्त माहितीनुसार वैधरित्या शस्त्र बाळगून बुलडाणा जिल्ह्यातील अंत्रीकोळी या आपल्या सासऱ्याच्या घरी आलेल्या एका तरुणाला व त्याचे इतर 2 साथीसादाराला अकोला एटीएस व रायपूर पोलिसांनी काल रात्री संयुक्त कारवाई करत अटक केली आहे.या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्र ग्राम अंत्रीकोळी ता. चिखली जि. बुलडाणा येथे गोपनीय माहितीच्या आधारे पंचासमक्ष आर्म एक्टप्रमाणे रेड कारवाई करण्यात आली.सदर कारवाईदरम्यान आरोपी शुभम सागर पवार रा. कारला चौक, वर्धा, रुपेश मिलन शिंदे व रोहेल मिलन शिंदे राहणार हसनाबाद ता.भोकरदन जि जालना हमु पाचोरा जि जळगाव यांच्या ताब्यातून 2 देशी बनावटीच्या पिस्टल,4 मॅगझीन, 92 जिवंत काडतुसे, 2 वापरलेली काडतुसे, एक लोखंडी चाकू, महिंद्रा कंपनीचे XUV500 वाहन क्रमांक MH 20 DJ 8687 तसेच आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल असा एकूण अंदाजे 7 लक्ष 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात कलम 3, 5, 7, 25 भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम 135(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस स्टेशन रायपूर ठाणेदार निलेश सोळंके,पोहेका दशरथ शितोळे, पोहेका ज्योती गलबले, पोका राहुल जाधव,अनंत कळमकर, अख्तर शेख, लक्ष्मण शिंदे, चालक सागर कोरडे तसेच दहशतवाद विरोधी पथक अकोला यांनी संयुक्तपणे पार पाडली. सदर गुन्ह्याचा तपास रायपूर ठाणेदार निलेश सोळंके पोकाॅ लक्ष्मण शिंदे करत आहे.





Social Plugin