Ticker

6/recent/ticker-posts

माणसाचे मन हेच सर्व गोष्टीला कारण : प. पू. सुदामराज बाबा शास्त्री



प्रतिनिधी : कैलास कोल्हे

गुरुपिंपरी: श्री रामेश्वर गंगाधर पाटील कोल्हे यांच्या वस्तू शांती व गृहप्रवेश निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथेत प. पू. सुदामराज बाबा शास्त्री यांनी मार्गदर्शन करताना “माणसाचे मन हेच सर्व गोष्टीला कारण असते,” असे प्रतिपादन केले.

गुरुपिंपरी परिसरात धार्मिक व भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. भागवत कथेस गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कथेदरम्यान अध्यात्म, संस्कार, मनाची शुद्धता व मानवतेचे महत्त्व यावर सुदामराज बाबा शास्त्री यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी भागवत कथेचा लाभ घेत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.