ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील जेष्ठ नागरिक प्रभन्ना होटलप्पा पाटील(९१)यांचे जेष्ठ नागरिक प्रभन्ना होटलप्पा पाटील(९१)यांचे शनिवार दि.३० मे रोजी राञी ८:४० वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर रविवार दि.३१ मे रोजी दुपारी १२ वाजता शेतमळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रभन्ना पाटील हे प्रतिष्ठित व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून गाव परिसरात सर्वपरिचित होते.यावेळी गाव,तालुका,जिल्हाभरातून आजी,माजी राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.त्यांच्या पश्चात चार मुले,चार सूना,दोन मुली,दोन जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माणिकराव पाटील, किसनराव पाटील, ग्रामपंचायत संगणक परिचालक राजेश पाटील, शेतकरी माधव पाटील यांचे वडील तर सेवा सहकारी सोसायटी
चेअरमन चंद्रकांत पाटील यांचे काका होत.
.jpg)




Social Plugin