बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांची निवड झाल्याबद्दल रेवलकरवाडी ता . खटाव येथे यशोदा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात शालेय, केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन यशोदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जगदाळे व उपाध्यक्ष सौ. द्वारका दत्तात्रय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ट्रस्टच्या वतीने डॉ. प्रियाताई शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल डॉ. प्रियाताई शिंदे यांनी ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जगदाळे यांचे विशेष अभिनंदन केले.
आपल्या सत्कारला उत्तर देताना डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या की"लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यशोदा चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवावेत. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने गावाच्या विकासासाठी आणि अशा उपक्रमांसाठी जे काही सहकार्य लागेल, ते निश्चितपणे दिले जाईल.
ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जगदाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गावातील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पाठीशी ट्रस्ट नेहमीच खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना प्रोत्साहन देईल.
या कार्यक्रमाला रेवलकरवाडी व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin