डॉ गुणवंत राठोड कारंजा
लाड प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील बहुतांश लाभार्थ्यांचे घरकुलाचे 2रा, 3रा व 4था हप्ता गेल्या 3 महिन्यांपासून प्रलंबित असल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. बांधकाम अर्धवट बंद पडल्याने व पावसाळा तोंडावर आल्याने शासनाच्या निधीचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत शिवसेना चे कारंजा तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, ओबीसी सेल तालुका प्रमुख अमोल पाटील भिंगारे, क्षमानंद निमगडे, शुभम भोयर, गणेश भाऊ धाये यांनी आज मंगळवारी लाभार्थ्यांसह वाशीम येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांची भेट घेऊन तात्काळ हप्ते वितरित करण्याचे निवेदन दिले.
*"लाभार्थ्यांनी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन बांधकाम सुरू केले. आता हप्ता न आल्याने ते दुहेरी संकटात आहेत. 15 दिवसांत मान्सून येईल. अर्धवट घरे व उघड्यावरचे साहित्य पावसात वाया जाईल. शासनाची बदनामी होईल," असा आरोप तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे यांनी केला.
निवेदनात पुढील 7 दिवसांत सर्व प्रलंबित हप्ते आधार लिंक खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हा परिषदेसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत प्रकल्प संचालक, DRDA सहायक प्रकल्प अधिकारी पाटील साहेब यांना निवेदन प्राप्त झाले आहे. कारंजा तालुक्याचा प्रलंबित निधीचा आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करू,"* अशी प्रतिक्रिया दिली.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी पाटील यांनाही पाठवल्या आहेत. यावेळी इतर लाभार्थी उपस्थित होते.





Social Plugin