Ticker

6/recent/ticker-posts

दसवडी येथे प. पू. श्री. सेवागिरी महाराज मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होणार



बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

वाई तालुक्यातील दसवडी येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू. श्री. सेवागिरी महाराज मंदिर व कलशारोहण सोहळ्याचा आठवा वर्धापन दिन सोमवार, दिनांक ११ मे आणि मंगळवार, दिनांक १२ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

धोम जलाशयाच्या निसर्गरम्य परिसरात आणि कृष्णामाईच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १०८ प. पू. महंत मठाधिपती श्री. सुंदरगिरीजी महाराज (पुसेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव संपन्न होईल.

कार्यक्रमाची रूपरेषा:

सोमवार, ११ मे २०२६:

सायंकाळी ५ ते ६: ह.भ.प. आदित्य महाराज यादव यांचा सुश्राव्य हरिपाठ.

सायंकाळी ६ ते ७: कृष्णाई महिला भजन मंडळ, गंगापुरी, वाई यांचा भजनांचा कार्यक्रम.

सायंकाळी ७ ते ७.३०: महिलांचा हळदी-कुंकू समारंभ.

रात्री ८ ते ९: महाप्रसाद.

मंगळवार, १२ मे २०२६ (मुख्य दिवस):

पहाटे ५ ते ७: काकड आरती व मंगल आरती.

सकाळी ८.३० ते १२: श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची व पादुकांची रथातून भव्य ग्राम प्रदक्षिणा (शोभायात्रा).

दुपारी १२.३० ते १: श्री. सुंदरगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते महाभिषेक, महापूजा, आरती व पुष्पवृष्टी.

दुपारी १ ते २: महाप्रसाद.

दुपारी २ नंतर: वाई तालुका पंचक्रोशीतील भजन मंडळांचा कार्यक्रम.

सायंकाळी ७ ते ९: शिवचरित्रकार वाणीभूषण ह.भ.प. गुरूदेव महाराज चव्हाण (कोपरगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन.

रात्री ९ नंतर: महाप्रसाद.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. मकरंद (आबा) पाटील, राज्यसभा खासदार ना. श्री. नितीन (काका) पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. राजूभाऊ चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मंगलमयी सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर कमिटी दसवडी, समस्त आनंद शेठ फणसे व सौ लीला आनंद शेठ फणसे परिवार आणि श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ: मु. पो. दसवडी, ता. वाई, जि. सातारा.