Ticker

6/recent/ticker-posts

घोटा येथील स्व माणिक किसन मोरे यांना श्रद्धांजली म्हणून मुलांचा समाजपयोगी संकल्प



प्रतिनिधी : विजय गायकवाड

रिसोड : रिसोड तालुक्यातील घोटा येथील सर्वदुर परिचित व्यक्तिमत्व असलेले स्व माणिक किसन मोरे यांच्या अल्पशा निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. यांचा परिचय करून द्यायचे झाले तर दिनांक 14.05.2026 ला त्यांना देवाज्ञा झाली त्यावेळेस त्यांचे वय 59 वर्षांचे होते. यापूर्वी ते तरुण वयामध्ये गावातील व पंचक्रोशीतील मुलांसाठी सर्वसमावेशक आखाडा चालवत असत. त्यामध्ये ते कुस्ती, लेझीम, बलखांब, दांडपत्ता, तलवार व काठी चालविणे या प्रकारचे विविध खेळ त्यांना स्वतः आत्मसात होते. याचाच फायदा त्यांनी गावातील व पंचक्रोशीतील मुलांसाठी करून दिला होता. ते एक सर्वसमावेशक व गरीब परिस्थितीतून वर आलेले असल्यामुळे त्यांना सर्वांची जाणीव होती. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ बोलका असल्यामुळे ते सगळ्यांचे आवडते झाले होते. परंतु नियती चुकत नसते त्याप्रमाणे हे समाजपयोगी कार्य करत असतानाच त्यांना अचानक एके दिवशी चक्कर येऊन डोक्याला मार लागला व पुढे ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यातून ते बाहेर आलेच नाही. घरच्यांनी खूप उपचार करून सुद्धा अखेर त्यांची प्राणज्योत मालावली. आज घोटा या त्यांच्या मूळगावी स्व माणिक किसन मोरे यांच्या आज रक्षा विसर्जन कार्यक्रम वेळी मुलगा शंकर माणिक मोरे व विवाहित मुलगी सौ मनिषा कैलासराव बाजड नेतन्सा व त्यांचे भाऊ जिजेबा किसन मोरे, त्र्यंबक किसन मोरे, दामोदर किसन मोरे व नारायण किसन मोरे तसेच दोन बहिणी सौ नर्मदा दत्तराव अवचार सापटगाव व सौ अनुसया शामराव बोंडे व्याड यांनी असे ठरविले की दहावी तेरवी वर होणाऱ्या खर्चातून वडिलांची आठवण म्हणून तीन झाडाचे वृक्षारोपण करून त्याचे जतन करणे व पवित्र अशा पाण्यामध्ये राख व अस्थी टाकण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये टाकण्याचा त्यांनी निर्णय घेऊन त्याचबरोबर रितीरिवाजप्रमाणे दहावी व तेरवीचा होणारा सर्व खर्च जिल्हा परिषद शाळा घोटा येथील विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून देण्यात येईल असा संकल्प त्यांनी केला. हा त्यांनी केलेला संकल्प प्रासंगिक काळानुसार लाभदायी ठरेल व एक सामाजिक संदेश लोकांमध्ये जाईल हीच त्यांच्या वडिलांना अंतिम श्रद्धांजली असेल. असे असे मत परिसरातील जनतेने व्यक्त केले आहे. निश्चितच या समाजपयोगी कार्याची दखल जनतेने घेऊन या कौतुकास्पद निर्णयाचे स्वागत सर्वत्र पंचक्रोशी मध्ये होत आहे व हीच खरी श्रद्धांजली स्वर्गीय माणिक किसन मोरे यांना असेल.