* **गुणवंत विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम; ९ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण**
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
रयत शिक्षण संस्थेच्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (S.S.C.) बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल **९६.३२%** लागला असून, परीक्षेस बसलेल्या एकूण १३६ विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी दैदित्यमान यश संपादन केले आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरातून विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यालयातून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या प्रथम नऊ गुणवंत विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:कु. श्रेया सुभाष कदम** – ९६.४०% विद्यालयात प्रथम क्रमांक ,कु. प्रियंका सचिन नलवडे ९३.२०% - द्वितीय क्रमांक ,कु. शर्वरी संदिप कवितके ९२.८०% - तृतीय क्रमांक ,कु. साईशा मंगेश देवकर ९२.६०% ,कु. शर्वरी प्रकाश पवार ९२.६०% ,कु. स्नेहांकिता सतीश जाधव ९२.२०% ,कु. भक्ती अमोल सावंत ९१.२०% ,कु. श्रावणी संदीप घाडगे ९०.८०% ,चि. ओंकार ज्ञानेश्वर भंडलकर ९०.२०% .
विद्यालयातील एकूण ९ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची टक्केवारीनुसार वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:
*८०% ते ८९% दरम्यान:** २० विद्यार्थी
*७०% ते ७९% दरम्यान:** ३३ विद्यार्थी
*६०% ते ६९% दरम्यान:** २८ विद्यार्थी
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए.बी. सावंत , पर्यवेक्षिका सौ. एस. यू. डुबल मॅडम , स्कूल कमिटी समितीचे सदस्य श्री बाळासाहेब जाधव ,श्री मोहन तात्या जाधव, श्री संतोष जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समिती , माता पालक संघ, गुरुकुल शिक्षक पालक संघ , सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ पुसेगाव पंचक्रोशी यांनी यशस्वी विद्यार्थी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला व विद्यालयाची यशाची परंपरा टिकवल्याबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.







Social Plugin