Ticker

6/recent/ticker-posts

9 जिल्ह्यांची जबाबदारी: मंगेश पाटील मुंदे विदर्भ विभाग अध्यक्ष माथाडी कामगार संघटनेच्या विदर्भ नेतृत्वपदी वर्णी

 


गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

 अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेच्या विदर्भ विभाग अध्यक्षपदी कारंजा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील श्री. मंगेश अरुणराव मुंदे यांची निवड करण्यात आली आहे. 

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनिष जनार्दन लांजेवार यांनी आज दि. 02/06/2026 रोजी अधिकृत नियुक्ती पत्र देऊन मुंदे यांची घोषणा केली. नोंदणी क्रमांक पीएल/पी/08/2025 असलेल्या या संघटनेचे मुख्य कार्यालय नालासोपारा, जि. पालघर येथे आहे.

नवनिर्वाचित विदर्भ विभाग अध्यक्ष मंगेश मुंदे म्हणाले, "संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन. विदर्भातील अमरावती, नागपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 9 जिल्ह्यांतील माथाडी, ट्रान्सपोर्ट व असंघटित कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा उभारला जाईल. शासनाच्या योजना कामगारांपर्यंत पोहोचवणे हे माझे प्राधान्य असेल."

मंगेश मुंदे यांच्या निवडीमुळे विदर्भात संघटना अधिक बळकट व गतिमान होईल, असा विश्वास कामगार वर्गातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.