Ticker

6/recent/ticker-posts

मोप येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन



प्रतिनिधी : विजय गायकवाड

रिसोड : येत्या 6 जुन रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत मोप ता. रिसोड येथे सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.

हे शिबिर कुमारेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात शनिवार दिनांक 6 जुन  रोजी सकाळी ८.०० ते १२.०० या वेळेत पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच मोप येथील गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.शिबिरासाठी डॉक्टर असोसिएशन मोप व प्राथमिक आरोग्य केंद्र मोप यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार असून यामध्ये , डॉ. उत्कर्ष वायाळ वाशिम (अस्थिरोग तज्ञ ), डॉ. कुलदीप देशमुख (जनरल फिजिशियन), डॉ. नंदकिशोर रंजवे (मूळव्याध तज्ञ), डॉ. राम बोडखे (जनरल फिजिशियन), डॉ. प्रताप डव्हळे (बालरोग तज्ञ), डॉ. अतुल जुनघरे (बालरोग तज्ञ), डॉ. महेश खानझोडे (दंतरोग तज्ञ), डॉ. प्रशांत आटोळे (हृदयरोग तज्ञ), डॉ. धनंजय माने (सोनोग्राफी सेंटर) तसेच डॉ. अमोल नरवाडे व डॉ. करुणा नरवाडे (स्त्रीरोग तज्ञ) हे रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन व उपचार करणार आहेत.

तसेच गरजू रुग्णांसाठी एक्स-रे व सोनोग्राफी सेवांमध्ये सवलत देण्यात येणार असल्याने या शिबिराचे विशेष महत्त्व अधोरेखित होते. विविध आजारांचे लवकर निदान व योग्य उपचार मिळण्यासाठी ही सुवर्णसंधी असून, परिसरातील नागरिकांनी व गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने शिवाजी कव्हर तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांची सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने गजानन खंदारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.