Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर नगरपालिका विद्यालय ग्रुपकडून मदतीचा उपक्रम; रक्कम मुलाच्या नावाने ठेवणार



कै. परशुराम पाटील यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी अमळनेर नगरपालिका माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपतर्फे पुढाकार घेण्यात आला. ग्रुपमधील सदस्यांनी एकत्र येत त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन व्यक्त केले तसेच आर्थिक मदत जमा केली.

या उपक्रमातून एकूण ₹26,500 इतकी रक्कम जमा झाली. या रकमेबाबत ग्रुपमध्ये विचारविनिमय करून ती रक्कम कै. पाटील यांच्या मुलाच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार येत्या सोमवारी ही रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात येणार असून, या सामाजिक उपक्रमासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले असून, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.