शिरूर, प्रतिनिधी : आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी साईराज धिरज गुगळे याने नेपाळमधील पोखरा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे शिरूरसह संपूर्ण देशाचा गौरव वाढला आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाच्या या यशामध्ये साईराजच्या कामगिरीचा मोलाचा वाटा राहिला.
साईराज हा शिरूर येथील आय.टी.के.बी. कराटे क्लास, रयत ग्राउंड येथे मागील अनेक वर्षांपासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने ब्लॅक-ब्राउन बेल्ट प्राप्त केला असून त्याच्या सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
त्याच्या या यशामागे ग्रँड मास्टर अकबर शेख सर (६ डॅन ब्लॅक बेल्ट, पुणे जिल्हाध्यक्ष) तसेच फैजान सर (३ डॅन ब्लॅक बेल्ट) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई सौ. संगीता गुगळे, श्री. चंदुलाल बैनाडे, श्री. रविंद्र बैनाडे, डॉ. मंगल बैनाडे आणि परिवारातील सर्व सदस्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले.
साईराजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. अश्विनी घारु, तृप्ती आगळे, अपर्णा वळसे, गौरी रसाळ तसेच सर्व शिक्षकवृंद आणि पालकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळविल्याने साईराज गुगळे हा शिरूरच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.





Social Plugin