Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर-राजाराम नगर परिसरातील वारंवार वीज ट्रिपिंगबाबत तात्काळ कार्यवाहीची मागणी






अमळनेर-राजाराम नगर परिसरात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा अत्यंत अस्थिर झाला असून दिवसातून वारंवार (सुमारे १० ते १५ वेळा) लाईट ट्रिप होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

या सततच्या ट्रिपिंगमुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर उपकरणे खराब झाली, तर त्याची जबाबदारी संबंधित वीज वितरण विभागावर राहील, याची नोंद घ्यावी.

तरी आपणास विनंती नसून मागणी आहे की, या समस्येचे तात्काळ निराकरण करून सुरळीत वीज पुरवठा सुनिश्चित करावा.