बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव ता . खटाव येथील सुपुत्र दिनेश फडतरे यांच्या संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या "रँडम" या बहुचर्चित ललित लेख संग्रहाला परिमल सांस्कृतिक व्यासपीठ, रोपळे, पंढरपूर या नामांकित संस्थेचा मानाचा समजला जाणारा "साहित्य परिमल"राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर जाहीर झालाय... अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष् सचिन कुलकर्णी यांनी कळवली आहे...
रँडमला मिळालेला हा सातवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे...
आजपर्यंत कांगोणी अहिल्यानगर, कराड,श्रीरामपूर,आसू फलटण येथील पुरस्कार या लेख संग्रहाला प्राप्त आहेत....
या पुरस्काराबद्दल त्यांचे सेवागिरी देवस्थानचे
मठाधिपती सुंदरगिरी महाराज,देवस्थानचे चेअरमन संतोष वाघ... सर्व विश्वस्त... ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, गावातल्या वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, संस्कृती प्रकाशन च्या प्रकाशिका सुनीताराजे पवार,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले..
स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ असं पुरस्काराचे स्वरूप आहे...
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि. 13/6/2026 रोजी पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.





Social Plugin