Ticker

6/recent/ticker-posts

घरगुती गॅस पुन्हा महागला ! 3 महिन्यांत तब्बल 89 रुपये वाढ, सर्वसामान्यांना फटका.

 

अर्धापूर प्रतिनिधी | एस.सावंत

गेल्या 3 महिन्यात घरगुती वापराच्या LPG सिलिंडरच्या दरात सलग वाढ झाली असून सिलिंडर मागे तब्बल ₹89 ने वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढणे आणि रुपयाची घसरण हे दरवाढीचे कारण पेट्रोलियम कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि कष्टकरी कुटुंबांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. आधीच डाळ, तेल, भाज्या महाग असताना गॅसची वाढ झाल्याने महिन्याला ₹200-300 जास्त खर्च करावा लागत आहे.

या दरवाढीचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसला आहे. "पगार तेवढाच पण खर्च वाढतच आहे" अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी मिळत असली तरी वाढत्या दरांमुळे तीही अपुरी पडत आहे. सरकारने दरवाढीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.