Ticker

6/recent/ticker-posts

स्व. हुकूमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर दे. मही येथे जागतिक योगदिन साजरा



प्रतिनिधी @ समाधान भुतेकर 

स्थानिक स्व. हुकूमचंदजी कोटेचा. सहकार विद्या मंदिर दे. मही येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर व पर्यवेक्षक श्री आप्पाराव खेडेकर सर यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगत योगशिक्षक श्री रमेश तळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अतिशय उत्साहात विविध योगासने केली कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक श्री केशव तळेकर सर यांनी आपल्या शब्दात सर्वांचे कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.