Ticker

6/recent/ticker-posts

विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उद्या मुंबईत आंदोलन



प्रतिनिधी @ समाधान भुतेकर 

 बुलडाणा: राज्यातील अंशतः अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांच्या प्रलंबित प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.२२) मुंबई येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंग वायाळ यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून अंशतः अनुदानित शाळांवर कार्यरत असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक शासनाच्या धोरणात्मक विलंबामुळे आर्थिक, मानसिक व सामाजिक अडचणींना सामोरे जात आहेत. अनेक शिक्षकांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणसेवेसाठी खर्च केले, मात्र त्यांना नियमित वेतन मिळाले नाही. काही शिक्षक वेतनाविना सेवानिवृत्त झाले असून अनेक कर्मचारी आजही आपल्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंग वायाळ यांची माहिती 

न्याय्य हक्काच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून वेळोवेळी वाढीव अनुदानाबाबत आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी न झाल्याने अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी शासनाने आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित शाळांवरील अन्याय दूर करावा. तसेच विद्यमान अनुदान सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील सर्व पात्र व त्रुटीपात्र शाळांना न्याय देत तातडीने १०० टक्के अनुदान लागू करावे. अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षणप्रेमींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतापसिंग वायाळ यांनी केले आहे.