Ticker

6/recent/ticker-posts

कलावंत निवडी मधील कथित आर्थिक गैरव्यवहार

 


स्वप्नील घोटेकार ग्रामीण प्रतिनिधी गुजरी 

 ऑडियो क्लिप संभाषणाची सत्यता तपासण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश द्यावेत.--ॲड.श्याम खंडारे.


  जिल्ह्यातील जेष्ठ कलाव॔त मानधन निवड प्रक्रीये दरम्यान     कथित गंभीर आर्थिक गैर व्यवहाराच्या ऑडीयो क्लीप संभाषणाची सत्यता तपासण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत,सत्यता आढळल्यास संबधित समिती सदस्यांचे सदस्यपद तात्काळ रद्द करावे,आर्थिक गैर व्यवहार करून समिती सदस्यानी निवड केलेल्या  संदेहास्पद व वादग्रस्त कलावंत निवडीचे पूनर्मूल्यांकण व्हावे,

यासह प्रामाणिक व ख-या  कलावंताची निवड यादी 30 जून पूर्वी जाहीर करावी ह्या मागणी साठी दि. 22 जून रोजी राष्ट्रसंत तूकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान समिती चे शेकडो पदाधिकारी ॲड.श्याम खंडारे संस्थापक अध्यक्ष ह्यांचे नेतृत्वात  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 30 जून पूर्वी योग्य न्याय न मिळाल्यास जिल्ह्यातील पाच हजार जेष्ठ कलावंत एक दिवशीय धरणे आंदोलन  व इतःपर प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण ऊपोषण सूरू करणार अशा आशयाची पूर्व सूचना व निवेदन मा.जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे.कलावंत निवडी मधे अशासकीय समिती सदस्याचे ऑडियो  संभाषण जिल्हाभर व मंत्रालयापर्यंत पोहोचले  फार मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे ह्यातून निदर्शनास येत असतांना समितीचे  अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी व सचिव ऊपमूकाअ [पं] ह्या गंभीर  संघटीत आर्थिक गून्ह्याची व मानहानीची दखल का घेत नाहीत कथित भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न का केल्या जात आहे असा सवाल करून पैशाच्या जोरावर बोगस कलावंत निवड करून  शेकडो प्रामाणिक व खरे कलावंत डावलण्याचे षडयंत्र राबविल्या गेल्याचा आरोप समस्त पदाधिका-यानी मा.जिल्हाधिकारी साहेबांच्या भेटीत व्यक्त केला.मा.जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने निर्णय घेवून समितीचे शासकीय सचीव तथा ऊपमूकाअ [ पं] ह्यांना संबधितांविरूध्द  एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिलेत व 30 जून पूर्वी कलावंत निवड यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले.निवेदन सादर करतांना समितीचे शेकडो मान्यवर पदाधिकारी ऊपस्थित होते. सिध्दार्थ भवरे,मूरलीधर धनरे,गंगाधर घोटेकर, वासूदेवराव दाभेकर,रमेश वाघमारे,हंसराज तलवारे, राजेश सिडाम, सूधीर भाऊ चौधरी, मोहनराव खडसे,मारोतराव आत्राम,बाबारावजी राऊत,वारकरी आघाडी प्रमूख हभप ज्ञानेश्वर महाराज,महीला आघाडी प्रमूख अस्मिता पाटील ई सह अनेकांनी.कलावंतांच्या अस्मितेच्या व अस्तित्वाच्या प्रश्नासाठी आमरण ऊपोषणाकरीता आपली तयारी दर्शवीली.

येत्या एक जूलै पर्यंत जिल्ह्यातील पाच हजार कलावंत जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलनासाठी ऊभे करण्याची तयारी सूरू झाल्याचे

 शिष्डमंडळातील पदाधिका-यानी मनोगत व्यक्त केले. ह्या अन्याया विरोधात हजारो कलावंत रस्त्यावर येवून ह्या लढ्यात दाखल होण्यासाठी तयारीत असल्याची कलावंताची मानसिकता व  वातावरण तयार झाले असल्याचे ॲड.श्याम खंडारे ह्यांनी  समाज माध्यमांना माहिती देतांना सांगीतले.