तुपकरांच्या_आंदोलनाची तात्काळ दखल घ्या; अन्यथा रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांसह_इशारा...
मन्सूर शहा धोत्रा भंनगोजी चिखली.:---,
प्राप्त माहितीनुसारशेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविमा यासह अव्वा च्या सव्वा बिल येत असल्याने सामान्य नागरीकांना याची झळ बसत असल्याने स्मार्ट मिटरची सक्ती थांबविण्यात यावी, त्याचप्रमाणे सौर उर्जाची सक्ती थांबविण्यात यावी शेतकऱ्यांना पुर्वी प्रमाणे मागेल त्याला कनेक्शन देण्यात यावे, कृषी औजारे व फळबाग योजनेचे रखडलेले अनुदान अदा करण्यात यावे, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते मा. रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथील निवासस्थानासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. तुपकरांच्या या आंदोलनाला चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील जोरदार पाठिंबा दिला आहे. दि १८ जुन रोजी चिखली पोलीस स्टेशन चे ठाणेदार भूषण गावंडे यांच्याशी चर्चा करीत शेतकऱ्यांच्या वतीने ठाणेदारांमार्फत मा. मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. ठाणेदारांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून ते शासन दरबारी पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी चिखली तालुक्यातील शेतकरी उपस्थित.होते.आंदोलन_छेडू, सरकार जबाबदार राहील'
सकाळी चिखली तालुक्यातीव विनायक सरनाईक, नितिन राजपुत, भगवान मोरे यांच्यासह आदिंना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणेदार यांनी घरपोच नोटिसा बजावल्या आहे. दरम्यान कार्यकर्ते यांनी सुद्धा आज निवेदन दिले असून सरकारने तुपकरांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य न केल्यास, चिखली तालुक्यातील शेतकरी देखील आक्रमक आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांसह दिला आहे.





Social Plugin