योगा नियमित करावा- योगशिक्षक प्रा. राजेंद्र बरकसे .
प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई,(बीड) - १२ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्ताने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालयात 21 जून रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये महाविद्यालयाचे एन. सी. सी., एन.एस.एस., क्रीडा विभाग,रोटरी क्लब ऑफ गेवराई, पतंजली योग समिती व महाराष्ट्र योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. सुरुवातीस महाविद्यालय विकास समिती सदस्य ॲड एच. एस . पाटील, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी राधेश्याम येवले, सेवानिवृत प्राचार्य राम महासाहेब, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे अधिकारी दीपक जगदाळे,रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, सचिव प्रवीण जैन, भावी अध्यक्ष गणेश कुलकर्णी, पाथफाइंडर अकॅडमीचे प्रशिक्षक पवन राऊत, महाराष्ट्र योग शिक्षक महासंघ अध्यक्ष अरुण परदेशी, सीता महासाहेब, प्रबंधक भास्कर सुरवसे आदींच्या उपस्थितीमध्ये रोपाला पाणी घालून व योग महर्षि पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2013-14 या वर्षात सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिन उपक्रम जगभर राबविण्यात येत आहे.र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रा राजेंद्र बरकसे यांनी योग वर्ग घेतला. सुरूवातीला यौगिक व्यायाम, शारीरिक हालचाली, तीन वेळा ओंकार ध्वनी, गायत्री मंत्र,महामृत्यंजय मंत्र, प्रार्थना मंत्र, संकल्प मंत्र, अन्नपूर्ण मंत्र, गुरुबद्दल आदर व्यक्त करणारा गुरुमंत्र सामूहिक घेऊन उभे राहून, बसून, पाठीवर व पोटावर बसून व्यायाम, योगासने, कपालभाती व अनुलोम विलोम सारखे आठ प्राणायाम प्रात्यक्षिकासह आणि शरीराला त्यामुळे होणारे लाभ याचीही माहिती देण्यात आली. सकाळी लवकर उठून व्यायाम, प्राणायाम, योगासने, जलतरण, सायकलिंग, वॉकिंग नियमित केल्याने आपली जीवनशैली बदलली जाते आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात होतो. नियमित आणि विधिवत व्यायामामुळे मनुष्य तंदुरुस्त व निरोगी होऊ शकतो, असे प्रतिपादन योगशिक्षक प्रा राजेंद्र बरकसे यांनी केले. र. भ. अट्टल महाविद्यालयामध्ये दररोज सुरू असलेल्या योग वर्गास सर्वांनी उपस्थित रहावे असेही आवाहन करण्यात आले.महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.महाविद्यालयाचा योगपटू सचिन मोहिते याने विविध प्रकारची कठिण योगासने करून दाखवली. त्यास उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. पतंजलि योग शिक्षक सदस्य भीमजी पटेल, सीता महासाहेब, मिलिंद कुलकर्णी, सुरेश मानधने, प्रकाश गिरी, दत्तात्रय साळुंके यांनी विविध योगासने सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन. सी. सी. विभागाचे लेफ्टनंट प्रा अभिजीत तौर, एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव, क्रीडा विभाग प्रमुख प्रा अरुण भराडे, डॉ रवींद्र खरात, सुदर्शन निकम, प्रा. सतीश जाधव, रोटरी क्लबचे संचालक राजेंद्र डेंगे, लड्डा, काळे, काला, मुंडे, घसिंग, सोलाने तसेच विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शांतिपाठ, सिंहासन आणि हास्यासन घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न झाला.





Social Plugin