शिवशंकर तुपकर सोनपेठ प्रतिनिधी.
पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवमल्हार वाघे यांच्या निवासस्थानी सोमवारी सदिच्छा भेट दिली, या वेळी तालुक्यातील विविध प्रश्नावर आ. राजेश विटेकर यांनी विस्तृत चर्चा केली,नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी
सोनपेठ येथे जनता दरबार घेण्याची विनंती या वेळी आ.श्री. विटेकर यांच्या कडे केली, सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात सुविधेचा अभाव आहे, विविध सेवा कार्यान्वित करण्यासाठी विनंती करून सोनपेठ- परभणी शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली.
परभणी विभागाला 15 नवीन शिवाई बस येणार आहेत, लवकरच छत्रपती संभाजी नगर सह परभणी शटल सेवा सुरू होईल अशी माहिती आ. राजेश विटेकर यांनी बोलताना दिली,
यावेळी जगदीश बुरांडे, लहूकुमार वाकणकर, प्रथमेश वाघे, कुलदीप भोसले, क्र.उ.बा.संचालक रामेश्वर मोकाशे आदी उपस्थित होते.





Social Plugin