Ticker

6/recent/ticker-posts

साहित्य परिमल राज्यस्तरीय पुरस्काराने लेखक दिनेश फडतरे सन्मानित


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पंढरपूर येथील नामांकित परिमल सांस्कृतिक व्यासपीठ यांच्या वतीने दिला जाणारा आणि अतिशय मानाचा समजला जाणारा साहित्य परिमल राज्यस्तरीय पुरस्कार पुसेगाव येथील लेखक दिनेश फडतरे यांच्या रँडम या ललित लेख संग्रहाला सन्मानाने प्रदान करण्यात आला...

     पंढरपूर येथे एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या  हस्ते फडतरेंचा गौरव करण्यात आला....

       या सोहळ्यासाठी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, मसाप पंढरपूर शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, युवा नेते प्रणव परिचारक, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पलता निकम,परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी उपस्थित होते....

     या सर्व मान्यवरांच्या हस्ते लेखक दिनेश फडतरे यांना हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला.... स्मृतिचिन्ह, पुस्तकांचा संच, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.