Ticker

6/recent/ticker-posts

बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर



मन्सूर शहा. धोत्रा.भंनगोजी.चिखली.

बुलढाणा,

 राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. १० जून व ११ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. आरक्षण सोडतीच्या सभेला तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार एस. एन. वाघ यांनी केले आहे.

दि. १० जून २०२६ रोजी सावळी, जनुना, बिरसिंगपूर, डोमरूळ, केसापूर, बोरखेड, रुईखेड टेकाळे, कोलवड, देवपूर, जांब, भादोला, अजिसपूर, भडगाव, म्हसला बु., सिंदखेड, पळसखेड भट, धामणगाव, मद, तांदूळवाडी, देऊळघाट, माळवंडी, रायपूर, कुंबेफळ, जामठी, धाड, चांडोळ आणि शिरपूर या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत होणार आहे.

तर दि. ११ जून २०२६ रोजी वरुड, दहिद बु., पळसखेड नाईक, तराडखेड, डोंगरखंडाळा, कुलमखेड, दुधा, वरवंड, साखळी बु., खुपगाव, सागवन, मातला, पांग्री, सोयगाव, चौथा, पाडळी, अंभोडा, नांद्राकोळी, दहिद खु., गुम्मी, हतेडी बु., सातगाव, मासरुळ आणि माळविहीर या ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग मिळणार असून आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणूक तयारीला सुरुवात होणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेची नोंद घेऊन संबंधित ग्रामपंचायत स्तरावरील सभांमध्ये उपस्थित राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.