बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
डिस्कळ ता . खटाव येथे रविवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाली. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून रोहित विठ्ठल चव्हाण (वय २३ वर्षे रा. डिस्कळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
फिर्यादी अमोल लहु पवार (वय ३७ वर्षे व्यवसाय मजुरी रा. चिंचणी ता. खटाव) यांनी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ८ वाजता डिस्कळ गावच्या हद्दीत बसस्थानकासमोर लहु किसन पवार (वय ६५) हे सुरेश शिवाजी भोसले ( वय ४२ वर्षे रा. चिंचणी) यांच्या सोबत त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना रोहित विठ्ठल चव्हाण याच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघातात लहु किसन पवार व सुरेश शिवाजी भोसले हे जखमी झाले. तर रोहित चव्हाण हे मयत झाले. याप्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या रोहित विठ्ठल चव्हाण याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे तपास करत आहेत.





Social Plugin