१ वर्षापासून प्रलंबित!! बांधकामगाराच्या मुलांची शैक्षणिक क्लेम, व इतर क्लेम बाबत आर्थिक नुकसान.!!
मन्सूर शहा धोत्रा. भंनगोजी चिखली.:-----
प्राप्त माहिती नुसार चिखली तालुक्यातील धोत्रा. भनगोजी, शेलसुर गावातील इमारत बांधकाम कामगारांचे १ वर्षापासून नूतनीकरण अर्ज प्रलंबित असून.! कामगारांना शासनाच्या कोणत्या योजनेचे फायदे मिळत नसून. वेळोवेळी त्यांचे नूतनीकरण चे अर्ज फेटाळण्यात येत असून. त्यामुळे इमारत बांधकामगार अडचणीत सापडले आहे. तसेच त्यांचे मुलांची शैक्षणिक क्लेम सुद्धा भरल्या जात नसून. त्यांचे शिक्षण घेतलेल्या मुलांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असून त्याची ओझे कामगारांच्या डोक्यावर पडत आहे. तसेच विवाह क्लेम करणे किंवा सेफ्टी , किट मिळणे किंवा पेटी मिळणे. या लाभापासून बांधकामगार वंचित राहत आहे! तसेच बांधकामगार कार्यालय बुलढाणा यांनी ग्रामसेवक यांना, बांधकामगार बद्दल माहिती मागितली होती . ती सुद्धा ग्रामसेवक मार्फत कार्यालय, बुलढाणा येथे जमा करण्यात आलेली आहे! महाराष्ट्र शासनाने दिनांक 9 सप्टेंबर 2014 रोजी आदेश दिला आहे की, बांधकाम कामगारांचे अर्ज एका महिन्याचे आत निकाली काढावेत. तसेच लोकसेवा हक्क हमी कायद्या अंतर्गत अर्ज मंजूरची स्पष्ट हमी देण्यात आलेली आहे. त्यानुसार तीन महिन्यापूर्वीचे सर्व प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करून कामगारांना न्याय द्यावा. नोव्हेंबर 2025 पासून बांधकाम कामगारांच्या योजनांना लोकसेवा हक्क आणि कायदा लागू करण्यात आलेला असतानाही त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचे दिसून येत आहे!
तसेच इमारत बांधकामगारांना लगेच न्याय मिळावा अशी ओरड कामगारातून होत आहे!!





Social Plugin