अखेर खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी भुमी (जमीन) अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्र मध्ये प्रकाशीत .
मन्सूर शहा. धोत्रा. भंनगोजी. चिखली.:---
"केंद्रियराज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे आभार "....
बुलढाणा खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी भूमी (जमीन ) अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्र मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे जिल्ह्याचे खासदार व केंद्रीयराज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय रेल्वे अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत .
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्वकांशी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे .या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे .त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता .केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावतीने सातत्याने रेल्वेमंत्री आणि रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे .खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहण करणे हेतू अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे .
रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ च्या कलम ३७A अन्वये S.O. 2647(E). रेल्वे अधिनियम, १९८९ (१९८९ चा २४) च्या कलम २ च्या खंड (३७A) अन्वये (ज्याचा यापुढे 'रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८' (२००८ चा क्र. ११) असा उल्लेख केला जाईल) प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकार याद्वारे "जालना-खामगाव दरम्यान नवीन बीजी (BG) मार्ग प्रकल्प (१६२ किमी)" यास, मध्य रेल्वे अंतर्गत "विशेष रेल्वे प्रकल्प" म्हणून अधिसूचित करते. ही अधिसूचना महाराष्ट्रातील जालना आणि खामगाव जिल्ह्यांमध्ये जमिनीचे संपादन करण्यासाठी आणि सार्वजनिक उद्देशाकरिता राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असून, ती या अधिसूचनेच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल असे या राजपत्रामध्ये म्हटले आहे .





Social Plugin