Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर शहराध्यक्षपदी मा. निलेशजी नंदा पंडित काळे यांची निवड



शिरूर प्रतिनीधी : महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये *मा. निलेशजी नंदा पंडित काळे* यांची *शिरूर शहराध्यक्ष* पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरूर शहरासह तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जाहीर करण्यात आलेल्या शिरूर तालुका कार्यकारिणीत सागर रोकडे (अध्यक्ष), सुनील जिंते (उपाध्यक्ष), योगेश शेंडगे (सचिव), अर्जुन शेळके (कार्याध्यक्ष), ओंकार भोरे (खजिनदार), अक्षय टेमगिरे (संपर्कप्रमुख), किरण पिंगळे-शेलार (कोषाध्यक्ष), आबासाहेब थोरात (प्रसिद्धीप्रमुख), बाबा इनामदार (कार्यकारी समिती अध्यक्ष), निलेश काळे (शिरूर शहराध्यक्ष), धनंजय साबळे (सहसंपर्क प्रमुख) आणि प्रफुल्ल बांबे (नियोजन समिती अध्यक्ष, पुणे जिल्हा) यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये *शिरूर शहराध्यक्ष* या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी *मा. निलेशजी नंदा पंडित काळे* यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शिरूर शहरातील विविध नागरी समस्या निर्भीडपणे समोर आणणे, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठविणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करणे ही त्यांची विशेष ओळख आहे.

अल्पावधीतच त्यांनी आपल्या प्रामाणिक, निडर आणि अभ्यासू पत्रकारितेच्या बळावर शिरूर शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरील प्रभावी पकड, लोकहिताच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका आणि अन्यायाविरोधातील लढाऊ वृत्ती यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

कमी वयात मोठी ओळख आणि प्रगती मिळवूनही त्यांनी आपले सामाजिक व पत्रकारितेचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली असल्याने शिरूर शहराच्या पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.