Ticker

6/recent/ticker-posts

मोखाडा ते नाशिक कडे गोवंश सप्लायर यांना पकडण्यात यश. बजरंग दल कडून धडक कारवाई.



प्रतिनिधी सौरभ आहेर 

 आपल्या मोखाडा तालुका हद्दीत पहाटे ५.००-५:३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मोखाडा *विश्व हिंदू परिषद/बजरंग दल कार्यकर्ते* यांना संपर्क कॉल आला की मोखाडा दिशेने एक पिकअप गाडी नो.MH01FE4210 जोरदार स्पीड ने जव्हार मार्गे मोखाडा येत आहे अशी माहिती मिळाली.

माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद बजरंग दल मोखाडा कार्यकर्ते यांनी मोखाडा पोलिस स्टेशन यांना संपर्क करून गाडी पाठलाग केला असता.मोखाडा - नाशिक रोड ने पाठलाग करत असताना ती पिकअप गाडी गोमास भरलेली गाडी ओवर स्पीड मुळे निलमातीच्या खालच्या टन ला वेगवान स्पीड असल्या मुले अपघात झाला.

गाडी अपघात झाल्याने या पिकअप गाडी मध्ये गोवंश कत्तल करून गाडीत गोमातेचे मास भरलेली आहे हे समजले असताच लगेच मोखाडा पोलिस प्रशासन यांनी लगेचच घटना स्थळी पोहचून कारवाई केली.

या कारवाई मध्ये असलेले गोवंश गोमाता हत्यारे सप्लायर यांना पकडण्यात आले असून गुन्हा नोंद झाला आहे व पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे.


*खाली दिलेली आरोपी यांची नाव-*
 *१)* इम्तियाज अब्दुल्ला फारुक एनापुरे 
*२)* रिजवान मुबारकअली शेख रा.वडाळा मुंबई

मोखाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 101/2026, भारतीय न्यायसंहिता कलम 109,132,281,324(3) , सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(c),9(a) सह मोटर वाहन अधिनियम कलम 184  दाखल झाला आहे.

बजरंग दल  मोखाडा तालुका अध्यक्ष संदेश भाडमुखे  याचा कडून कठोर करावाई व्हावी या करता पोलीस प्रशासना कडे मागणी केली आहे.