Ticker

6/recent/ticker-posts

जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीत वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार यांचा सत्कार




शिक्षकांच्या प्रलंबित  प्रश्नांवर सकारात्मक चर्चा


ग्रामीण प्रतिनिधी आरिफ खान 

जळगांव  जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त वेतन पथक अधीक्षक . दिलीप पवार यांचा जळगांव  जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, जळगांव  च्या मुख्य कार्यालयात विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या वतीने माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी

शिक्षक नेते  एस. डी. भिरूड  यांचीही प्रमुख उपस्थिती होती. माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि ज्युनिअर कॉलेज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वेतन अधीक्षकांच्या स्तरावरील प्रलंबित वेतन देयके, भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) परतावा प्रकरणे, रजा रोखीकरणाची प्रकरणे तसेच डी.सी.पी.एस. धारक कर्मचाऱ्यांच्या स्लीप वितरणासंदर्भातील प्रश्न यावर चर्चा झाला. या सर्व प्रकरणांचा तातडीने पाठपुरावा करून संबंधित कामे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही वेतन पथक अधीक्षक . दिलीप पवार यांनी उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाला जळगांव  जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष शैलेश राणे, उपाध्यक्ष तुषार बोरसे, सचिव डी. एस. पाटील, खजिनदार अजय पाटील, ज्युनिअर कॉलेज संघटनेचे  मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, मुख्याध्यापक संघटनेचे . बाळासाहेब पाटील, पतपेढीचे संचालक डिगंबर पाटील, जे. पी. सपकाळे, सिद्धेश्वर वाघुळदे, यावल तालुका पतपेढीचे चेअरमन किरण झांबरे, नूतन मराठा संस्थेचे संचालक मोहन पाटील, प्रा. धनराज भारुडे, कलाध्यापक संघटनेचे अरुण सपकाळे, सुरेश गायकवाड, जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्ष साधना लोखंडे तसेच जळगाव शहरातील  महिला मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात समन्वय वाढविण्याची गरज व्यक्त केली. नवीन वेतन पथक अधीक्षकांच्या नियुक्तीमुळे प्रलंबित प्रशासकीय कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा  शिक्षक नेते एस डी भिरुड यांच्यासह उपस्थितांनी व्यक्त केली

सत्कार समारंभानंतर उपस्थित मान्यवरांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी परस्पर सहकार्याची भूमिका मांडली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

सत्कार समारंभानंतर उपस्थित मान्यवरांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी परस्पर सहकार्याची भूमिका मांडली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.