बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाकडून शिक्षक व विद्यार्थी यांच्या क्षमता-गुणवत्ता विकासासाठी होत असलेले कार्य शिक्षण क्षेत्रातील अनेक घटकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे असे गौरवोद्गार प्रो.डॉ.दयानंद तिवारी यांनी काढले.
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संभाजीनगर,सातारा येथील राष्ट्रभाषा भवनाच्या मुख्य सभागृहात मंडळाच्या कार्यात गौरवशाली योगदान देत असलेल्या मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात मुंबईच्या श्री.जे.जे.टी
.विश्वविद्यालयाचे प्रोफेसर डॉ.दयानंद तिवारी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष श्री.ता.का.सूर्यवंशी होते तर विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,साताराचे हिंदी विभागाध्यक्ष डॉ.गजानन भोसले हे उपस्थित होते. हिंदी शिक्षक महामंडळाचे सचिव हणमंत सूर्यवंशी , राज्य परीक्षा प्रमुख सुधाकर माने, राज्य कोषाध्यक्ष शाहनवाज मुजावर,परीक्षा मंत्री शि.रा.खामकर,पतसंस्था चेअरमन विजयकुमार पिसाळ,वाचनालय अध्यक्ष मारुती शिवदास,भवन सचिव श्रीकांत लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. तिवारी पुढे म्हणाले हिंदीचे योद्धा ता.का.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली फक्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हिंदी विषयाचे चाललेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. राष्ट्रभाषा भवनातील सरस्वती व लक्ष्मी यांच्यातील समन्वय वाखाण्यासारखा आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी गत ४२ वर्षांपासून सातत्याने राबविले जात असलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. आजच्या भावस्पर्शी,आनंद सोहळा भारावून टकणारा आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल श्रीफल,सम्मानचिहन देऊन स्वागत करण्यात आले. मंडळाचे कार्याध्यक्ष नेताजी ननावरे यांनी प्रास्ताविकात मंडळ व सहयोगी संस्थाच्या कार्याचा आढावा घेतला. हिंदी शिक्षक महामंडळाचे मुखपत्र हिंदी अध्यापक मित्र त्रैमासिक पत्रिकेचे यावेळी मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी मोहन भिसे,बिबी,दीपक भापकर,मुंजवडी, विठ्ठल निकाळजे, चव्हाणवाडी,विजय यादव,सातारा, अनिल वायदंडे,जिहे,लक्ष्मण घनवट,सातारा अनप्पा सतुबर,सोलापूर या सर्व मुख्याध्यापकांचा संपूर्ण परिधान,पुस्तके,गौरवचिहन व सम्मानपत्र देवून सपत्निक सत्कार करणेत आला.
भिसे, निकाळजे,यादव व वायदंडे या सत्कारमूर्तींनी आपल्या भाषणातून हिंदी परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. गजानन भोसले यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना येथील भावनिक एकात्मता,कार्यकर्त्याच्या निष्ठा व ता.का.सूर्यवंशी यांच्या समर्पणाचा आवर्जून उल्लेख केला.
ता. का.सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मान्यवरांच्या योगदानाची प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे कार्यवाह अनंत यादव यांनी सर्वाँचे आभार मानले.राष्ट्रीय गान वंदे मातरमच्या सामूहिक प्रस्तुतीने कार्यक्रमाची सांगता झाली.जेष्ठ सदस्या मिनाक्षी बडिगार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इकबाल मुल्ला,सुनंदा शिवदास, दिपाली पवार,विकास चव्हाण,संजय शिंदे, अरविंद थोरात महाळाप्पा शिंदे,मनोहर काटकर,व्यवस्थापक नवनाथ शिंदे व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
छायाचित्र - सातारा - डॉ दयानंद तिवारी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार स्विकारताना श्री विठ्ठल निकाळजे व्यासपीठावर डॉ गजानन भोसले,हिंदी शिक्षक महामंडळ अध्यक्ष ता.का सूर्यवंशी , सचिव हणमंत सूर्यवंशी व मान्यवर छाया - प्रकाश राजेघाटगे





Social Plugin